Thursday, 31 May, 2007

अपायकारक शीतपेये

बहुसंख्य
लोकांना, यात लहानमुले, तरूण प्रौढ व्यक्तीसुध्दा समाविष्ट आहेत, बाटलीबंद शीतपेये पिण्याचे वेड असते. अगदी दोन ते तीन महिन्याच्या मुलांनाही ही पेये पाजताना प्रस्तुत लेखिकेच्या पाहण्यात आलेले आहे. बारा महिने लोक ही पेये पीत असतात. जेवतानासुध्दा पाण्याऐवजी हीच पेये पिताना लोक दिसतात. काही लोक उन्हाळ्यामध्ये ही शीतपेये घेतात.


या सर्व पेयांमध्ये साधारण ८० -९० टक्के पाणी असते त्यामुळे या पेयांमुळे तुमची पाण्याची गरज काही प्रमाणात भागू शकते. पण कोणतेही पोषकतत्व त्यात नसते. त्यामुळे त्यापासून शरीराला पोषण काहीच मिळत नाही. त्यामुळे अशी शीतपेये केव्हातरी घेणे वेगळे पण बाहेर किंवा घरातही सतत तीच पेये पीत राहणे हे आरोग्याला अतिशय अपायकारक आहे.

हल्ली कोकाकोला, थम्स अप, पेप्सी आणि कायकाय नावे असलेली शीतपेये पिण्याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते. हा बराचसा जाहिरातींचाच परिणाम आहे. उन्हाळ्यामध्ये तर टीव्ही वर या पेयांच्या एकमेकांविरुध्द जाहिरातींचे युध्दच पहायला मिळते.
पण बाजारात मिळणारी ही शीतपेये आरोग्याला सर्वात जास्त अपायकारक आहेत . या पेयांमध्ये स्वादासाठी कृत्रीम पदार्थ घातलेले असतात. तसेच ती टिकावी म्हणून रासायनिक पदार्थही घातलेले असतात. आणि काही काही पेयांमध्ये तर कीटक नाशकांचे घातक प्रमाणही आढळून आलेले आहे.
या कृत्रीम पेयांमुळे अलर्जी होऊ शकते. ही पेये महाग तर असतातच पण त्यातून उष्मांकही भरपूर मिळतात. त्यामुळे सतत अशी पेये पिण्याने शरीरात गरजेपेक्षा जास्त उष्मांक जातात. परिणामी वजन वाढू शकते. ही पेये सतत पिण्यामुळे हाडांवर परिणाम होऊन हाडे ठिसूळ बनतात.

शीतपेये सीलबंद बाटलीतूनच मिळतात म्हणून ती घेणे चांगली असा युक्तीवाद ते घेणारे करतात पण सध्या प्रत्येक गोष्ट नकली मिळते. तशीच शीतपेयेही नकली बनविली जातात. आणि बाटलीबंद असली तर ती कोणत्या झोपडपट्टीत, कोणत्या पाण्यापासून बनविली असतील ते फक्त ते बनविणारेच जाणोत. त्यामुळे केवळ बाटलीबंद आहेत म्हणून ही पेये घेणेच चांगले!
तेव्हा ही अशी पेये पिण्याचे फायदे तर काहीच नाहीत पण तोटे मात्र भरपूर आहेत. त्यामुळे जाहिरातींना भूलून ही शीतपेये पिणे म्हणजे हळूहळू विष घेण्यासारखेच आहे.
मग अमीरखान कितीही सांगू देत की, " थंडा मतलब कोकाकोला" किंवा सलमान खान कितीही विचारू दे " Have you grown up to Thump Up yet?" किंवा शाहरूख, सचिन किंवा अमिताभ बच्चन कितीही म्हणूदे " ये दिल मांगे मोअर!".
दिल कितीही " मांगे मोअर" असलं तरी ही पेये आहेत " डेंजरस मोअर" हे तुम्ही लक्षात घ्या!!

Friday, 25 May, 2007

पौष्टीक पेय : नीरा

नेहमीच्या
पेयांव्यतिरिक्त अजून एक आरोग्यदायी पेय आहे जे महाराराष्ट्रात फारशा लोकांना माहीत नाही. ते म्हणजे "नीरा."
नीरा ही शिंदीच्या ( ताडाच्या किंवा माडाच्या झाडाचा एक प्रकार ) झाडापासून मिळविली जाते. झाडांना खाचा दिल्या जातात. या खाचेतून गळणारे पाणी त्याखाली मातीचे मडके बांधून जमविले जाते. हे ताजे पाणी म्हणजेच नीरा.

झाडांपासून गोळा केलेली ताजी नीरा थंड असून ती चवीला गोड लागते. नीरा ही उत्कृष्ठ तृष्णा शामक तर आहेच शिवाय शुध्द ताजी नीरा हे एक चांगले पौष्टीक पेय समजले जाते. तसेच त्याच्यात पाचक रोग निवारक शक्ती आहे असे म्हटले जाते. तसेच साधारण तासाभरातच प्यायली तर ते एक दारूविरहीत (Non Alcoholic) पेय आहे.

म्हणूनच महात्मा गांधीनीही नीरा पिण्याची शिफारस केली होती.

नीरा काढल्याऩंतर साधारण एक तासभर ती सामान्य तपमानामध्ये दारूविरहीत (Non Alcoholic) राहू शकते. ती थंड तपमानात ठेवली नाही तर त्यानंतर मात्र सूक्ष्म जंतूंच्या प्रभावामुळे ती आंबण्याची प्रक्रिया चालू होते. साधारण पाच ते आठ तासात ही आंबण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन दारुविरहीत ( Non Alcoholic) नीरा ही ताडी या दारुमय ( Alcoholic) पेयामध्ये रुपांतरीत होते.


त्यामुळे झाडांपासून जेथे नीरा मिळविली जाते तेथेच ती रस्त्यावरच्या टपरीतून किंवा तेथून साधारण १०० कि. मी. पर्यंतच्या परिसरातच ती विकली जाते. जेथे ताडांची झाडे जास्त असतात अशा किना रपट्टीच्या प्रदेशात नीरा जास्तकरून मिळते. इतरत्रही जेथे शिंदीची झाडे आहेत तेथे नीरा काढली जाते

महारष्ट्रातही नीरा मिळते पण केरळ, कर्नाटक मध्ये नीरा या पेयाला सामाजिक जीवनात खूपच महत्व आहे. केरळ, कर्नाटक मध्ये तर घरासमोरच बायका नीरा विकत बसतात. केरळमध्ये तर काही देवळांमध्ये पूजेच्या वेळी देवाला वाहिल्या गेलेल्या प्रसादासाठी ही नीरा वापरली जाते.

Tetrapack मध्ये नीरा!

नीरेमध्ये सूक्षम जंतूची वाढ होऊन ती ताडीमध्ये रुपांतरीत होऊ नये यासाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ( National Chemical Laboratory NCL) या संस्थेने पाच वर्षाच्या प्रयोगानंतर एक तंत्र शो्धून काढले आहे. या तंत्रात पॉलीमरपासून बनविलेला सूक्ष्म जाळीचा पडदा ( polymer membrane) वापरून नीरा गाळली गेल्यामुळे त्यातील सूक्ष्म जीवजंतू ९९ टक्के बाजूला काढले जातात. यामुळे साधारण १५ दिवस पर्यंत नीरा न आंबता ताजी राहू शकते. तसेच त्यातील पौष्टीक गुणही जसेच्या तसे राहू शकतात. खादी व ग्रामोद्योग मंडळाने डहाणूजवळ नीरा प्रक्रिया करण्यासाठी एक प्लांट ( Neera Processing Plant) चालू केला आहे. नीरा हे पेय आता इतर पेयांप्रमाणे Tetrapack मध्ये उपलब्ध होण्य़ाची शक्यता आहे.Sunday, 20 May, 2007

आरोग्यदायी पेये

प्राचीन भारतीय लोकांनी उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम स्वास्थ्याचे महत्व सांगितले आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी सकाळी उठल्यानंतर पाणी, जेवणानंतर ताक झोपताना दूध पिणे आवश्यक आहे असेही सांगितले आहे. तसेच ही पेये घेतल्याने तर वैद्याची गरज राहणार नाही असेही सांगितले आहे.
तुमच्यापैकी काही जण चहाकॉफी पित असतील. काहीजण दूध तर काह जण फळांचे रस घेत असतील. तर आणखी काहीजणांना बाजारात मिळणा-या अनेक त-हेच्या शीतपेयांची आवड असेल.
जास्त करून उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागते. याला कारणही आहे. कारण उन्हाळ्यामध्ये घामावाटे सेच लघवीवाटे जास्त प्रमाणात पाणी क्षार शरीरातून निघून जात असतात. या पाण्याची क्षारांची भरपाई व्हावी लागते म्हणूनच तहान लागते. त्यामुळे तहान लागली की पाणी किंवा काहीतरी थंड पेय पिणे आवश्यक ठरते नाहीतर थकवा येतो. चहा, कॉफी, दूध, ताक, लस्सी, तयार सरबते किंवा फळांचे रस हे तर नेहमीच घेतले जातात. याव्यतिरिक्त कधीतरी बाजारात गेल्यावर उसाचा रसही घेतला जातो. काहीजण बाजारात मिळणारी थंड पेये घेत असतील.
पण या पेयांमध्ये पाण्याबरोबरच इतर काय घटक आहेत हेही तुम्ही जाणून घेतलेच पाहिजेत. एवढेच नाही तर कोणती पेये शरीराला हितकारक आहेत कोणत्या पेयांमुळे तुम्हाला काय अपाय होऊ शकतो हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

सगळ्यात चांगली पेये आहेत, ताज्या फळांचे घरी काढलेले रस. आवडत असेल तर दूध, ताक लस्सी. या सर्व पेयांमधून साधारण किती पाणी, किती उष्मांक साखर मिळते. हे पाहणे देखिल महत्वाचे आहे.
प्रत्येक पेयापुढे दिलेले आकडे हे त्यातील पाणी, उष्मांक साखर या क्रमाने दिले आहेत.

दिलेले प्रमाण १०० ग्रॅम पिण्यायोग्य पेयातील आहे.


 1. मोसंबी ८८.४ / ४० / ७.

 2. संत्री ९७. / ०९ / .

 3. कलिंगड ९५. / १६ / .

 4. सफरचंदाचा रस ८४.६ / ५९ / १३.

 5. टोमॅटोचा रस ९३.१ / २० / ३.

 6. नारळपाणी ९३. / २४ / ४.

 7. उसाचा रस ९०.२ / ३९ / ९.

 8. ताक ९७.५ / १५/ .

 9. ऑरेंज क्वॅश - / ३० / ७.

 10. क्रिम सोडा - / २४ / ६.

 11. लेमोनेड - / २२ / ५.

 12. कोला तत्सम पेये - / ३४ / ८.

 13. नळाचे पाणी १०० / ० /

 14. खनिजयुक्त पाणी १०० / ० /

एक ग्लास म्हणजे २०० मिलिलिटर मोसंबी रसातून तुम्हाला साधारण १५ ग्रॅम साखर ८० कॅलरीज मिळू शकतात. तेवढ्याच संत्र्याच्या रसातून ३.ग्रॅम साखर १८ कॅलरीज मिळू शकतात. यावरून तुम्ही ठरवू शकता की कोणता रस तुम्हाला योग्य आहे. तुमचे वजन थोडे जास्त असेल तुमची तहान तर भागली पाहिजे पण कॅलरीज जास्त नकोत तर तुम्हाला संत्र्याचा रस उत्तम. तसेच इतर रसांपेक्षा संत्र्याच्या रसात साखरही कमीच असते त्यामुळे मधूमेही व्यक्तीही हा रस घेऊ शकतात.

ोसंबी, संत्री, सफरचंद, कलिंगड, टोमॅटो, गाजर, काकडी , गव्हांकूर तसेच पालक, कारली अशा भाज्या यांचा रस तुम्ही घरी करून घेऊ शकता. कलिंगडामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनिमिया किंवा पंडुरोग असेल तर कलिंगड खाणे किंवा त्याचा रस पिणे उत्तम. कलिंगडाच्या खालोखाल सफरचंदामध्ये लोहाचे प्रमाण आहे. या फळांपैकी काहीही घरात नसेल तर लिंबू अवश्य असतेच. साखर मीठ घालून लिंबाचे सरबत हे केव्हाही चांगलेच. साख नको असेल तर मध घालूनही ते चांगलेच आहे. सकाळी अनशापोटी मध घालून लिंबू पाणी पिणे हे आयुर्वेदातही सांगितले आहे. त्याने वजन कमी होते. मधूमेही व्यक्तींसाठी साखरेऐवजी सॅकॅरीन चालेल.
बाहेर गेल्यावर उसाचा रस शहाळी ही उत्तम पेये आहेत.
त्यातही
नुसती तहानच भागवायची असेल तर नारळपाणी उत्तम.
पण खूप दमला असाल त्वरीत शक्ती देणारी साखर हवी असेल तर उसाचा रस उत्तम.
कोणत्याही ताज्या फळांच्या रसातून थोडी प्राथमिक पोषकतत्वे, जीवनसत्वे तसेच खनिजद्रव्ये मिळतात.
चहा कॉफीमध्ये दूध असते म्हणून त्यातून पोषकतत्वे मिळत असली तरी त्यात कॅफिन नावाचे उत्तेजक तत्व असते. ते शरीरास अपायकारक आहे.

कोणतेही पेय प्यायचे तर आधी स्वच्छता ही पाहायलाच हवी. म्हणूनच घरी बनविलेले फळांचे ताजे रस, दूध, ताक , लस्सी, लिंबू सरबत तसेच नारळपाणी हे केव्हाही चांगलेच.
उन्हाळ्यात
घरी बनविलेल्या कैरीच्या पन्ह्याची सर कुठल्याच पेयाला येणार नाही.

उन्हाळ्यासाठी आणखी एक पौष्टीक पेय आहे तुळशीच्या बियांची खीर. यामुळे तहान तर भागतेच पण त्यातील पोषकता औषधी गुणधर्मांचा फायदाही मिळतो.
एक कप खिरीसाठी २-चमचे तुळशीचे बी - तास पाण्यात भिजत घालावे. बी फुगून चांगले मऊ होते. पाणी काढून कप दूध घालून मिश्रण चांगले ढवळावे. थोडी शिजवून किंवा तशीच खीर प्यावी. अशा खिरीतून साधारण १५० कॅलरीज मिळतात.

बाहेरच्या पेयांमध्ये उसाचा रस स्वच्छता पाहून प्यायला हरकत नाही. पण शक्यतो बर्फ घालता पिणे उत्तम. बर्फ कोणत्या पाण्यापासून बनविलेले असते माहीत नाही. तसेच ते ब-याच वेळा कुठेही ठेवलेले असते. त्यामुळे ते स्वच्छ व रोगजंतूविरहीत असेलच याची खात्री नसते.

बाहेर पाणी प्यायचेच असेल तर बाटलीबंद मिनरल वॉटर घेणे चांगले!Tuesday, 15 May, 2007

जलसंजीवनी !

जल हे जीवन आहे म्हणूनच काही कारणाने शरीरातील पाणी क्षार यांचे प्रमाण त्वरेने कमी होऊ लागले तर कधी कधी उपचाराआधीच माणूस दगावू शकतो.

हगवण हा असाच एक आजार आहे ज्यात शरीरातील पाणी क्षार यांचे प्रमाण अति त्वरेने व अति प्रमाणात कमी होते. हगवणीची लक्षणे आहेत जुलाब होणे, शौचास पातळ होणे. हगवण ही जंतूसंसर्गामुळे होते. कधीकधी तर शौचावाटे रक्तही पडते. हगवण जुलाब याबरोबर उलट्याही होऊ शकतात.

या सर्वांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर शरीरातून पोटॅशियम सोडियम हे क्षार निघून जातात. त्यामुळे त्यांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे स्नायु शिथील होतात. थकवा येतो. उलट्या होत असल्याने माणूस काही खाऊही शकत नाही.
त्यामुळे प्रत्येक जुलाब उलटीमुळे शरीरातील कमी होणारे पाण्याचे प्रमाण क्षारांची भरपाई ताबडतोब होणे गरजेचे असते.
पण ते झाले नाही आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण सतत मी होत गेले तर रक्तदाब कमी होतो. रक्तदाब सतत कमी राहिला तर शरीरातील अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही . मूत्रपिंडाचा रक्तपुरवठा कमी होतो मूत्र बनण्याची क्रिया मंदावते. परिणामी शरीरात अपायकारक तत्वे साचून राहतात. परिणामी कमी रक्तदाब निकामी मूत्रपिंड यामुळे रोगी दगावू शकतो.


जास्तकरून लहान मुलांमध्ये या हगवणीमुळे शरीरातील पाणी अतिप्रमाणात कमी होते ते त्वरीत भरून काढले नाही तर डॉक्टरकडे जाण्याआधीच मूल दगावण्य़ाची शक्यता असते.
अशावेळी दवाखान्यात जाईपर्यंत जर घरीच काही प्रथमिक उपचार त्वरीत चालू केले तर निदान जीव वाचविला येतो.
जीव वाचविण्याच्या दृष्टीने घरीच सुरू करण्यासारखा काय उपाय आहे?

अशावेळी जीवन देते जलसंचीवनी!

जीवनदायी जलसंजीवनी !
जीवन देणारी ही जलसंजीवनी आहे पाणी शरीरास आवश्यक असणा-या क्षारांचे प्रमाणित मिश्रण!
याने जुलाब उलट्या यामुळे शरीरातील कमी होणारी पाण्याची क्षारांची पातळी भरून निघण्यास मदत होते.
३.ग्रॅम खायचे मीठ ( सोडियम क्लोराईड) + २० ग्रॅम साखर ( ग्लुकोज) + २.खाण्याचा सोडा( सोडा बाय कार्ब) + १.ग्रॅम पालाश ( पोटॅशियम ) हे सर्व घनपदार्थ एकत्र करून बवविलेल्या मिश्रणाची तयार पाकिटे औषधाच्या दुकानात मिळतात.

एक पाकिट एक लिटर पाण्यात विरघळविल्यानंतर जे द्राव बनते ती आहे जलसंजीवनी !

ही तयार झालेली जलसंजीवनी जुलाब उलट्या होत असताना सतत पित / पाजत राहणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील कमी झालेल्या पाणी क्षारांची भरपाई शरीरास होऊ शकते.जलसंजीवनी घरी बनवा :
आयत्यावेळी जर जलसंजीवनीचे पाकिट घरी नसेल किंवा दुकानात मिळाले नाही तरी काही काळजी करण्याचे कारण नाही. ही जलसंजीवनी तुम्ही घरीही बनवू शकता.

एक लिटर पाण्यामध्ये साधारण आठ चमचे साखर एक चमचा मीठ टाका विरघळवा. ही झाली तुमची जलसंजीवनी तयार !
यामधून शरीराला त्वरीत पाणी , सोडियम ऊर्जा मिळते.

याच्या जोडीला नारळाचे पाणी घेतले तर त्यातून पोटॅशियमची कमतरता भरून येते.

त्यामुळे हगवण / उलट्या होत असलेल्या व्यक्तीस ही जलसंजीवनी त्वरीत चालू करून दवाखान्यात जाईपर्यंत सतत पाजत रहावे.

जास्त प्रमाणात जास्त दिवस हगवण होत असेल तर भूक मंदावते. अशावेळी जलसंजीवनी बरोबर फळांचे रस, ताक, डाळीचे पाणी भाताची पेज इत्यादी घेणे आवश्यक आहे. त्यातून इतर पोषक घटक शरीराला मिळतात.

यापुढे जर घरी, आजूबाजूला कोणाला हगवण / उलटी होत असेल तर सर्वात प्रथम ही जलसंजीवनी घरच्या घरी तयार करून त्याचा वापर सुरू करा.
जलसंजीवनीमुळे जुलाब/ उलट्या थांबणार नाहीत हे लक्षात घ्या. पण हगवणी उलट्यांमुळे होणारी शरीरातील पाणी क्षार यांची कमतरता भरून येईल. तेव्हा जुलाब/ पातळ शौचास/ उलट्या होत असतील तर डॉक्टरकडे तर जाच पण त्याआधी ताबडतोब त्या व्यक्तीस जलसंजीवनी चालू करा !


Thursday, 10 May, 2007

तुम्ही पाणी खातही असता !!

तुम्ही पाणी नुसते पितच नाही तर ते तुम्ही खातही असता!

वाचून आश्चर्य वाटले ना? पण कसे ते वाचा.

समजा तुमची पाण्याची रोजची गरज दोन लिटर एवढी आहे आणि एखादे दिवशी तुम्ही एकच लिटर पाणी प्याला तरीही तुम्हास पाण्याची कमतरता कदाचित जाणवणार नाही. कारण तुमची उरलेली गरज तुम्ही खाल्लेल्या अन्नातून भागविली जाते.

वनस्पती, प्राणी इत्यादी सर्व सजीवांमध्ये पाण्याचा भरपूर अंश असतो. तुम्ही शाकाहारी असाल तर याच वनस्पती व तुम्ही मांसाहारी असाल याच प्राण्यांपासून तुमचे अन्न येते. त्यामुळे तुमच्या आहारातील जवळजवळ सर्व अन्नपदार्थांमध्ये पाणी असतेच.

या तक्त्यावरूनच कल्पना येईल.
काकडी : ९९ %
कलिंगड : ९५ %
गाजर : ९० %
सर्व भाज्या व पालेभाज्या : ८० ते ९० %
फळांचे रस : ९० %
संत्री : ८७।६ %
मक्याचे दाणे : ६७ %
पाव : ३९ %
पनीर : ३७ %
धाने, कडधान्ये व डाळी : १० ते २० %अ, ड, ई, के ही जीवनसत्वे वगळता इतर सर्व पोषक अन्नघटक पाण्यामध्येच विरघळतात. अशी द्रवरूप पोषके शरीराच्या सर्व पेशी व अवयवांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम पाणीच आहे.
या पोषक अन्नघटकांचे ऊर्जेत अथवा शरीराच्या वाढीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी लागणा-या पोषक मूलतत्वांमध्ये रुपांतर होणे यासाठी ज्या रासायनिक क्रिया शरीरात घडतात त्या सर्व क्रिया द्रावण स्वरुपात होतात. यासाठी शरीराला पाण्याची अत्यंत गरज आहे. शरीरात निर्माण होणारे टाकावू पदार्थ बाहेर टाकण्यासाठी सुध्दा पाण्याची गरज आहे.

शरीराच्या कार्यासाठी म्हणूनच तुमच्या शरीरात पाण्याचे पुरेसे व योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे.
अन्नाशिवाय तुम्ही साधारण ६ ते ८ आठवडे जगू शकाल पण पाण्यावाचून एक आठवड्यापेक्षा जास्त जगू शकणार नाही. शरीरातील पाणी वीस टक्क्याहून जास्त कमी झाले तर तुमचे शरीर सुकत जाऊन अतिशय वेदना होऊन मृत्यू येतो.
म्हणूनच रोज निदान २ ते २.५ लिटर पाणी शरीरात गेलेच पाहिजे.

Please Sign My Guestbook