Friday 25 May, 2007

पौष्टीक पेय : नीरा

नेहमीच्या
पेयांव्यतिरिक्त अजून एक आरोग्यदायी पेय आहे जे महाराराष्ट्रात फारशा लोकांना माहीत नाही. ते म्हणजे "नीरा."
नीरा ही शिंदीच्या ( ताडाच्या किंवा माडाच्या झाडाचा एक प्रकार ) झाडापासून मिळविली जाते. झाडांना खाचा दिल्या जातात. या खाचेतून गळणारे पाणी त्याखाली मातीचे मडके बांधून जमविले जाते. हे ताजे पाणी म्हणजेच नीरा.

झाडांपासून गोळा केलेली ताजी नीरा थंड असून ती चवीला गोड लागते. नीरा ही उत्कृष्ठ तृष्णा शामक तर आहेच शिवाय शुध्द ताजी नीरा हे एक चांगले पौष्टीक पेय समजले जाते. तसेच त्याच्यात पाचक रोग निवारक शक्ती आहे असे म्हटले जाते. तसेच साधारण तासाभरातच प्यायली तर ते एक दारूविरहीत (Non Alcoholic) पेय आहे.

म्हणूनच महात्मा गांधीनीही नीरा पिण्याची शिफारस केली होती.

नीरा काढल्याऩंतर साधारण एक तासभर ती सामान्य तपमानामध्ये दारूविरहीत (Non Alcoholic) राहू शकते. ती थंड तपमानात ठेवली नाही तर त्यानंतर मात्र सूक्ष्म जंतूंच्या प्रभावामुळे ती आंबण्याची प्रक्रिया चालू होते. साधारण पाच ते आठ तासात ही आंबण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन दारुविरहीत ( Non Alcoholic) नीरा ही ताडी या दारुमय ( Alcoholic) पेयामध्ये रुपांतरीत होते.


त्यामुळे झाडांपासून जेथे नीरा मिळविली जाते तेथेच ती रस्त्यावरच्या टपरीतून किंवा तेथून साधारण १०० कि. मी. पर्यंतच्या परिसरातच ती विकली जाते. जेथे ताडांची झाडे जास्त असतात अशा किना रपट्टीच्या प्रदेशात नीरा जास्तकरून मिळते. इतरत्रही जेथे शिंदीची झाडे आहेत तेथे नीरा काढली जाते

महारष्ट्रातही नीरा मिळते पण केरळ, कर्नाटक मध्ये नीरा या पेयाला सामाजिक जीवनात खूपच महत्व आहे. केरळ, कर्नाटक मध्ये तर घरासमोरच बायका नीरा विकत बसतात. केरळमध्ये तर काही देवळांमध्ये पूजेच्या वेळी देवाला वाहिल्या गेलेल्या प्रसादासाठी ही नीरा वापरली जाते.

Tetrapack मध्ये नीरा!

नीरेमध्ये सूक्षम जंतूची वाढ होऊन ती ताडीमध्ये रुपांतरीत होऊ नये यासाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ( National Chemical Laboratory NCL) या संस्थेने पाच वर्षाच्या प्रयोगानंतर एक तंत्र शो्धून काढले आहे. या तंत्रात पॉलीमरपासून बनविलेला सूक्ष्म जाळीचा पडदा ( polymer membrane) वापरून नीरा गाळली गेल्यामुळे त्यातील सूक्ष्म जीवजंतू ९९ टक्के बाजूला काढले जातात. यामुळे साधारण १५ दिवस पर्यंत नीरा न आंबता ताजी राहू शकते. तसेच त्यातील पौष्टीक गुणही जसेच्या तसे राहू शकतात. खादी व ग्रामोद्योग मंडळाने डहाणूजवळ नीरा प्रक्रिया करण्यासाठी एक प्लांट ( Neera Processing Plant) चालू केला आहे. नीरा हे पेय आता इतर पेयांप्रमाणे Tetrapack मध्ये उपलब्ध होण्य़ाची शक्यता आहे.







Please Sign My Guestbook