Tuesday 15 May, 2007

जलसंजीवनी !

जल हे जीवन आहे म्हणूनच काही कारणाने शरीरातील पाणी क्षार यांचे प्रमाण त्वरेने कमी होऊ लागले तर कधी कधी उपचाराआधीच माणूस दगावू शकतो.

हगवण हा असाच एक आजार आहे ज्यात शरीरातील पाणी क्षार यांचे प्रमाण अति त्वरेने व अति प्रमाणात कमी होते. हगवणीची लक्षणे आहेत जुलाब होणे, शौचास पातळ होणे. हगवण ही जंतूसंसर्गामुळे होते. कधीकधी तर शौचावाटे रक्तही पडते. हगवण जुलाब याबरोबर उलट्याही होऊ शकतात.

या सर्वांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर शरीरातून पोटॅशियम सोडियम हे क्षार निघून जातात. त्यामुळे त्यांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे स्नायु शिथील होतात. थकवा येतो. उलट्या होत असल्याने माणूस काही खाऊही शकत नाही.
त्यामुळे प्रत्येक जुलाब उलटीमुळे शरीरातील कमी होणारे पाण्याचे प्रमाण क्षारांची भरपाई ताबडतोब होणे गरजेचे असते.
पण ते झाले नाही आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण सतत मी होत गेले तर रक्तदाब कमी होतो. रक्तदाब सतत कमी राहिला तर शरीरातील अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही . मूत्रपिंडाचा रक्तपुरवठा कमी होतो मूत्र बनण्याची क्रिया मंदावते. परिणामी शरीरात अपायकारक तत्वे साचून राहतात. परिणामी कमी रक्तदाब निकामी मूत्रपिंड यामुळे रोगी दगावू शकतो.


जास्तकरून लहान मुलांमध्ये या हगवणीमुळे शरीरातील पाणी अतिप्रमाणात कमी होते ते त्वरीत भरून काढले नाही तर डॉक्टरकडे जाण्याआधीच मूल दगावण्य़ाची शक्यता असते.
अशावेळी दवाखान्यात जाईपर्यंत जर घरीच काही प्रथमिक उपचार त्वरीत चालू केले तर निदान जीव वाचविला येतो.
जीव वाचविण्याच्या दृष्टीने घरीच सुरू करण्यासारखा काय उपाय आहे?

अशावेळी जीवन देते जलसंचीवनी!

जीवनदायी जलसंजीवनी !
जीवन देणारी ही जलसंजीवनी आहे पाणी शरीरास आवश्यक असणा-या क्षारांचे प्रमाणित मिश्रण!
याने जुलाब उलट्या यामुळे शरीरातील कमी होणारी पाण्याची क्षारांची पातळी भरून निघण्यास मदत होते.
३.ग्रॅम खायचे मीठ ( सोडियम क्लोराईड) + २० ग्रॅम साखर ( ग्लुकोज) + २.खाण्याचा सोडा( सोडा बाय कार्ब) + १.ग्रॅम पालाश ( पोटॅशियम ) हे सर्व घनपदार्थ एकत्र करून बवविलेल्या मिश्रणाची तयार पाकिटे औषधाच्या दुकानात मिळतात.

एक पाकिट एक लिटर पाण्यात विरघळविल्यानंतर जे द्राव बनते ती आहे जलसंजीवनी !

ही तयार झालेली जलसंजीवनी जुलाब उलट्या होत असताना सतत पित / पाजत राहणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील कमी झालेल्या पाणी क्षारांची भरपाई शरीरास होऊ शकते.



जलसंजीवनी घरी बनवा :
आयत्यावेळी जर जलसंजीवनीचे पाकिट घरी नसेल किंवा दुकानात मिळाले नाही तरी काही काळजी करण्याचे कारण नाही. ही जलसंजीवनी तुम्ही घरीही बनवू शकता.

एक लिटर पाण्यामध्ये साधारण आठ चमचे साखर एक चमचा मीठ टाका विरघळवा. ही झाली तुमची जलसंजीवनी तयार !
यामधून शरीराला त्वरीत पाणी , सोडियम ऊर्जा मिळते.

याच्या जोडीला नारळाचे पाणी घेतले तर त्यातून पोटॅशियमची कमतरता भरून येते.

त्यामुळे हगवण / उलट्या होत असलेल्या व्यक्तीस ही जलसंजीवनी त्वरीत चालू करून दवाखान्यात जाईपर्यंत सतत पाजत रहावे.

जास्त प्रमाणात जास्त दिवस हगवण होत असेल तर भूक मंदावते. अशावेळी जलसंजीवनी बरोबर फळांचे रस, ताक, डाळीचे पाणी भाताची पेज इत्यादी घेणे आवश्यक आहे. त्यातून इतर पोषक घटक शरीराला मिळतात.

यापुढे जर घरी, आजूबाजूला कोणाला हगवण / उलटी होत असेल तर सर्वात प्रथम ही जलसंजीवनी घरच्या घरी तयार करून त्याचा वापर सुरू करा.
जलसंजीवनीमुळे जुलाब/ उलट्या थांबणार नाहीत हे लक्षात घ्या. पण हगवणी उलट्यांमुळे होणारी शरीरातील पाणी क्षार यांची कमतरता भरून येईल. तेव्हा जुलाब/ पातळ शौचास/ उलट्या होत असतील तर डॉक्टरकडे तर जाच पण त्याआधी ताबडतोब त्या व्यक्तीस जलसंजीवनी चालू करा !


Please Sign My Guestbook