अन्न स्रोत :
मानवी शरीरास वाढीसाठी पोषकतत्वे , निरोगी राहण्यासाठी जीवनसत्वे तसेच शरीराचे नियमित कार्य सुरू ठेवण्यासाठी ऊर्जा लागते. याशिवाय मानवी शरीर व्यवस्थित काम करू शकणार नाही.
ही पोषकतत्वे, जीवनसत्वे व ऊर्जा यांचा स्रोत आहे आपण रोजच्या आहारात घेतलेले अन्न. सर्व सजीवांना, यात मानवाव्यतिरिक्त प्राणी व वनस्पती यांचाही समावेश आहे, जिबंत राहण्यासाठी अन्न लागते.
वनस्पतीजगत ( सर्व प्रकारच्या वनस्पती व झाडे) आणि प्राणीजगत ( मनुष्य़ व इतर सर्व प्राणी) यांच्या अन्नात मात्र एक फरक आहे. किंबहूना असे म्हणू शकतो की अन्न मिळविण्याच्या बाबतीत महत्वाचा फरक आहे.
झाडे व वनस्पती स्वत:ला लागणारे अन्न स्वत:च्या शरीरात स्वत:च तयार करतात पण माणूस व इतर प्राणी मात्र तसे करू शकत नाही.
प्राणीमात्रांना अन्नासाठी वनस्पती जगतावरच अवलंबून रहावे लागते. शाकाहारी असाल तर प्रत्यक्षपणे व मांसाहारी असाल तर अप्रत्यक्षपणे, पण वनस्पतीच तुम्हाला अन्न पुरवित असतात. जे अन्न त्यांनी स्वत:साठी बनविलेले असते त्याच अन्नावर मनुष्य़ व इतर प्राणीमात्र जगतात.
Photosynthesis या रासायनिक क्रियेने वनस्पतीं आपले अन्न पुढीलप्रकारे बनवितात.
सोबताच्या चित्रातली अन्नाची ही साखळी पाहिली तर ही वस्तुस्थिती ध्यानात येईल.
सजीवांमध्ये मनुष्य प्राणी हा श्रेषठ समजला जातो पण स्वत:चे अन्न स्वत: बनवून शिवाय ते इतरांनाही पुरविणारी वनस्पतीच खरे तर श्रेष्ठ ठरायला हवी !
अन्न वर्गीकरण:
अन्न प्रत्यक्षपणे कुठुन येते यानुसार वर्गीकरण केल्यास दोन प्रकार आहेत.
(१) वनस्पतीजन्य शाकाहारी अन्न
(२) प्राणीजन्य मांसाहारी अन्न
वनस्पतीजन्य म्हणजेच शेतीपासून मिळणा-या अन्नाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल.
(१) धान्ये/कडधान्ये : गहू, बाजरी, मका, तांदूळ, बार्ली, राई इत्यादी धान्ये व वेगवेगळ्या डाळी व कडधान्ये. प्राचीन काळापासून मनुष्य या धान्यांच्या पिठापासून बनविलेले अन्नच खात आला आहे
(२) फळे : मोसंबी, संत्री, द्राक्षे, सफरचंद, टरबूज, बोरे, अननस, पेरु, चिकू, केळी,अंजीर, डाळींबे, कलिंग्ड व अनेक प्रकारची विविध फळे.
(३) भाज्या : यातही अनेक प्रकार आहेत.
(ब) फळभाज्या: कोबी, नवलकोल, फुलकोबी, वांगी, मुळा, गाजर, घेवडा, परवर, तोंडली, कारली, दोडका, करटोली,भोपळा, घोसाळे, कोनफळ, फरसबी, भेंडी, वालपापडी, शेवग्यांच्या शेंग, गवार, टोमॅटो आणि कितीतरी प्रादेशिक भाज्या....
(४) पेये: चहा, कॉफी, कोको इत्यादी
(५) तेले : वेगवेगळी वनस्पतीजन्य तेले व द्राव(६) अन्य वनस्पतीजन्य पदार्थ : शेंगा, बिया, सुवासिक पाने व मसाल्याचे पदार्थ
(७) प्रक्रिया केलेले पदार्थ : सोयादुधापासून बनविलेला टोफू नावाचा पनीर किंवा चीझ सारखा पदार्थ.आशिया, आफ्रिका व लॅटीन अमेरिका या खंडातील लोक मुख्यत: शेतीपासून मिळालेले अन्नच खातात.
(२) प्राणिजन्य मांसाहारी अन्न :यामध्ये मांस, अंडी, मासे व दूधदुभते यांचा समावेश होतो.
प्राणी :सर्वसाधारण पणे बकरी, मेंढी व बोकड इत्यादींपासून मिळणारे मांस खाल्ले जाते. काही लोक बैल, डुक्कर इत्यादीपासून मिळणारे मांसही खातात. पुर्वीच्या काळी शिकारी लोक हरीण, ससा यांची शिकार करून खात पण आता हे प्राणी पाळायला व शिकारीला बंदी आहे.
काही देशांमध्ये वानर, साप, घोडे, गोगलगाय इत्यादींचे मांसही खातात.
(३) अंडी : भारतात नेहमी कोंबडी, बदक व मासे इत्यादींची अंडी खाल्ली जातात.
इतरत्र : गल, पेंग्विन, सूसर, मगर यांची अंडीही खाल्ली जातात
अंड्यासाठी या पक्षांचा व प्राण्यांचा सांभाळ केला जातो.
अंडी जशीच्या तशीच किंवा शिजवून वा उकडून बहूधा न्याहरीसाठी खाल्ली जातात. काही गोड पदार्थ जसे केक, पुडींग, कस्टर्ड बनविण्यासाठीही अंडी वापरली जातात.(४) मासे: समुद्राच्या खा-या पाण्यातील विवध प्रकारचे मासे तसेच नदी, तलाव अशा गोड पाण्यातील मासे यांचा खाण्यासाआठी उपयोग केला जातो.
(६) दूध व दुग्धजन्य पदार्थ :
बहूतेक सर्व देशांमध्ये गायी व म्हशीचे दूध वापरले जाते. काही प्रदेशांमध्ये उपलब्धतेनुसार बकरी, शेळी, मेंढी, रेनडियर व उंटीणीचे दूध वापरले जाते. दूध आहे तसेच कच्चे अथवा उकळून पिण्यासाठी व चहाकॉफीसाठी वापरले जाते. याशिवाय दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, पनीर, क्रीम, चीझ इत्यादी प्रकार बनविता येतात. दुधाची भुकटी करून ती साठविता येते.
Powered by ScribeFire.