आरोग्यदायी पेये
प्राचीन भारतीय लोकांनी उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम स्वास्थ्याचे महत्व सांगितले आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी
सकाळी उठल्यानंतर पाणी, जेवणानंतर ताक व झोपताना दूध पिणे आवश्यक आहे असेही सांगितले आहे. तसेच ही पेये घेतल्याने तर वैद्याची गरज राहणार नाही असेही सांगितले आहे.
तुमच्यापैकी काही जण चहाकॉफी पित असतील. काहीजण दूध तर काही जण फळांचे रस घेत असतील. तर आणखी काहीजणांना बाजारात मिळणा-या अनेक त-हेच्या शीतपेयांची आवड असेल.प्राचीन भारतीय लोकांनी उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम स्वास्थ्याचे महत्व सांगितले आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी

जास्त करून उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागते. याला कारणही आहे. कारण उन्हाळ्यामध्ये घामावाटे तसेच लघवीवाटे जास्त प्रमाणात पाणी व क्षार शरीरातून निघून जात असतात. या पाण्याची व क्षारांची भरपाई व्हावी लागते म्हणूनच तहान लागते. त्यामुळे तहान लागली की पाणी किंवा काहीतरी थंड पेय पिणे आवश्यक ठरते नाहीतर थकवा येतो. चहा, कॉफी, दूध, ताक, लस्सी, तयार सरबते किंवा फळांचे रस हे तर नेहमीच घेतले जातात. याव्यतिरिक्त कधीतरी बाजारात गेल्यावर उसाचा रसही घेतला जातो. काहीजण बाजारात मिळणारी थंड पेये घेत असतील.
पण या पेयांमध्ये पाण्याबरोबरच इतर काय घटक आहेत हेही तुम्ही जाणून घेतलेच पाहिजेत. एवढेच नाही तर कोणती पेये शरीराला हितकारक आहेत व कोणत्या पेयांमुळे तुम्हाला काय अपाय होऊ शकतो हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.
सगळ्यात चांगली पेये आहेत, ताज्या फळांचे घरी काढलेले रस. आवडत असेल तर दूध, ताक व लस्सी. या सर्व पेयांमधून साधारण किती पाणी, किती उष्मांक व साखर मिळते. हे पाहणे देखिल महत्वाचे आहे.
प्रत्येक पेयापुढे दिलेले आकडे हे त्यातील पाणी, उष्मांक व साखर या क्रमाने दिले आहेत.
दिलेले प्रमाण १०० ग्रॅम पिण्यायोग्य पेयातील आहे.

- मोसंबी ८८.४ / ४० / ७.३
- संत्री ९७.७ / ०९ / १.९
- कलिंगड ९५.८ / १६ / ३.३
- सफरचंदाचा रस ८४.६ / ५९ / १३.७
- टोमॅटोचा रस ९३.१ / २० / ३.६
- नारळपाणी ९३.८ / २४ / ४.४
- उसाचा रस ९०.२ / ३९ / ९.१
- ताक ९७.५ / १५/ ०.५
- ऑरेंज क्वॅश - / ३० / ७.०
- क्रिम सोडा - / २४ / ६.४
- लेमोनेड - / २२ / ५.७
- कोला व तत्सम पेये - / ३४ / ८.८
- नळाचे पाणी १०० / ० / ०
- खनिजयुक्त पाणी १०० / ० / ०

मोसंबी, संत्री, सफरचंद, कलिंगड, टोमॅटो, गाजर, काकडी , गव्हांकूर तसेच पालक, कारली अशा भाज्या यांचा रस तुम्ही घरी करून घेऊ शकता. कलिंगडामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनिमिया किंवा पंडुरोग असेल तर कलिंगड खाणे किंवा त्याचा रस पिणे उत्तम. कलिंगडाच्या खालोखाल सफरचंदामध्ये लोहाचे प्रमाण आहे. या फळांपैकी काहीही घरात नसेल तर लिंबू अवश्य असतेच. साखर व मीठ घालून लिंबाचे सरबत हे केव्हाही चांगलेच. साखर नको असेल तर मध घालूनही ते चांगलेच आहे. सकाळी अनशापोटी मध घालून लिंबू पाणी पिणे हे आयुर्वेदातही सांगितले आहे. त्याने वजन कमी होते. मधूमेही व्यक्तींसाठी साखरेऐवजी सॅकॅरीन चालेल.

बाहेर गेल्यावर उसाचा रस व शहाळी ही उत्तम पेये आहेत.
त्यातही नुसती तहानच भागवायची असेल तर नारळपाणी उत्तम.
पण खूप दमला असाल व त्वरीत शक्ती देणारी साखर हवी असेल तर उसाचा रस उत्तम.
कोणत्याही ताज्या फळांच्या रसातून थोडी प्राथमिक पोषकतत्वे, जीवनसत्वे तसेच खनिजद्रव्ये मिळतात.
चहा कॉफीमध्ये दूध असते म्हणून त्यातून पोषकतत्वे मिळत असली तरी त्यात कॅफिन नावाचे उत्तेजक तत्व असते. ते शरीरास अपायकारक आहे.
कोणतेही पेय प्यायचे तर आधी स्वच्छता ही पाहायलाच हवी. म्हणूनच घरी बनविलेले

उन्हाळ्यात घरी बनविलेल्या कैरीच्या पन्ह्याची सर कुठल्याच पेयाला येणार नाही.
उन्हाळ्यासाठी आणखी एक पौष्टीक पेय आहे तुळशीच्या बियांची खीर. यामुळे तहान तर भागतेच पण त्यातील पोषकता व औषधी गुणधर्मांचा फायदाही मिळतो.
एक कप खिरीसाठी २-३ चमचे तुळशीचे बी ५-६ तास पाण्यात भिजत घालावे. बी फुगून चांगले मऊ होते. पाणी काढून १ कप दूध घालून मिश्रण चांगले ढवळावे. थोडी शिजवून किंवा तशीच खीर प्यावी. अशा खिरीतून साधारण १५० कॅलरीज मिळतात.

बाहेरच्या पेयांमध्ये उसाचा रस स्वच्छता पाहून प्यायला हरकत नाही. पण शक्यतो बर्फ न घालता पिणे उत्तम. बर्फ कोणत्या पाण्यापासून बनविलेले असते माहीत नाही. तसेच ते ब-याच वेळा कुठेही ठेवलेले असते. त्यामुळे ते स्वच्छ व रोगजंतूविरहीत असेलच याची खात्री नसते.
बाहेर पाणी प्यायचेच असेल तर बाटलीबंद मिनरल वॉटर घेणे चांगले!
