रासायनिक रचने प्रमाणे स्निग्धघटक दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत.
(१) संपृक्त स्निग्धघटक : ( Saturated Fat ) :यामध्ये प्रत्येक कार्बन अणू दुस-या अणूला एकाच बाजूने जोडलेला असतो व प्रत्येक कार्बन अणूला हायड्रोजनचे जास्तीत जास्त अणू जोडलेले असतात.
संपृक्त तेले ही जास्तकरून प्राणीजन्य असतात. उदाहरणार्थ लोणी, तूप, मांस, गुरांची चरबी. तसेच वनस्पतीजन्य डालडा, खोबरेल व पाम तेले ही सुद्धा संपृक्त तेले आहेत.
या तेलांमध्ये मायरिस्टिक ( Myristic Acid) व पामिस्टिक ( Palmistic Acid) ही स्निग्धाम्ले असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. पर्यायाने त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
(२) असंपृक्त स्निग्धघटक:Unsaturated fat
ज्या स्निग्धघटकामध्ये कार्बनची जास्तीत जास्त दुहेरी बंधने तितका तो स्निग्धघटक मऊ व नरम असतो. कार्बनच्या साखळीवर त्याच्या नरम पणा अवलंबून असतो.
ही तेले वनस्पतीजन्य असतात. उदाहरणार्थ शेंगदाणे, बिया, सोयाबिन, मका , सूर्यफुलाचे बी, ऑलिव्ह व तीळ इत्यादिपासून काढलेली तेले.
यातही दोन प्रकार आहेत.
(अ) एकेरी असंपृक्त तेले : MonoUnsaturated Fatty Acids ( MUFA):
यात कार्बनचे एकच दुहेरी बंधन असते व त्यात ओलेइक ( Oleic acid) हे स्निग्धाम्ल असते. ओलेईक स्निग्धाम्लाच्या आकृतीत कार्बनचे एकच दुहेरी बंधन दिसते आहे.)
(ब) अतिअसंपृक्त तेले : PolyUnsaturated Fatty Acid ( PUFA) :
यामध्ये कार्बनची दोन किंवा दोनापेक्षा जास्त दुहेरी बंधने असलेली स्निग्धाम्ले असतात. यातील मुख्य स्निग्धाम्ल( मेदाम्ल) आहे लिनोलेईक ( Linoleic Acid). या मेदाम्लाची इतर रुपे पण असतात. लिनोलीक ( Linoleic) आणि अरचिडोनीक ( Arachidonic Acid) ही सर्व अतिआवश्यक ( Essential Fatty Acids) स्निग्धाम्ले आहेत.
सामान्य तपमानाला ही स्निग्धघटके ज्या स्वरुपात राहतात त्यानुसारही त्यांचे दोन गट आहेत.
(१) द्रवरूप : Liquid Fat
हे स्निग्धघटक नेहमीच्या तपमानात द्रवस्वरूपात राहतात. ती असंपृक्त असून अशी तेले वनस्पतीजन्य व मांसापासून मिळणारी असतात.
ही स्निग्धघटके नेहमीच्या तपमानात द्रवरूप न राहता घन स्वरूपात अथवा कडक स्वरुपात राहतात. कार्बनच्या दुहेरी साखळीला हायड्रोजन्चे अणू जोडून तेलांपासून कडक वा घन स्वरुपातील स्निग्धघटक बनविता येतो.