अन्न : भौगोलिक विचार
प्रादेशिक अन्न :
प्रादेशिक अन्न :
ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशात जे धान्यप्रकार सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात अशाच धान्यप्रकारांचा उपयोग करुन बनविलेले अन्न पदार्थच आपल्या मुख्य जेवणात असतात. कोकणातसमुद्रापासून मासे मिळतात व तेथिल जमीनही भातशेतीस उपयुक्त त्यामुळे साहजिकच कोकणात राहणा-यालोकांच्या रोजच्या आहारात मासे व भात हेच मुख्य़ अन्न असेल.
देशावर किंवा घाटावर मुख्यत्वे ज्वारी, बाजरी , गहू व भाजीपाला भरपूर पिकविला जातो तर तेथील लोक रोजज्वारी व बाजरीची भाकरी व भाजीच खाणार.
असे जरी असले तरी कधीतरी रोजच्यापेक्षा वेगळे, इतर प्रदेशातील खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होते. अधूनमधून आपण ते खातही असतो. भारतातील कोणत्याही प्रांतात आपण गेलो तर
तेथील स्थानिकपदार्थांच्या जोडीला इतर प्रांतातील खाद्यपदार्थही आपणास मिळू शकतात. दक्षिण भारतीय इडली सांबार, डोसा, पंजाबी सामोसा,
गुजराती खमण ढोकळा,
महाराष्ट्रीय भजी,
वडापाव
हे काही खाद्यपदार्थ सर्व प्रांतातइतके सहज मिळतात की आपण ते वेगळ्या प्रांतातील आहेत हे लक्षातही येत नाही.
या स्थानिक पदार्थ्यांच्या जोडीला आंतरराष्ट्रीय़ पदार्थही आता सहज सगळी कडे उपलब्ध आहेत. त्याचीएक खास आवडही काहींना निर्माण झाली असेल.
जसे चायनीज पदार्थ तर आज जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात मिळू शकतो. इटलीचा पिझ्झा व पास्ता तर सर्वत्रच मिळतो. युरोप अमेरिकेतही भारतीय व आशियाई उपहारगृहे आहेत.
देशोदेशीचे अन्न :
देशोदेशी जशा भाषा बदलतात, वेश बदलतो, चालीरिती बदलतात तसाच आहारही बदलतो. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगेवेगळे खाद्यप्रकार खाल्ले जातात. वेगवेगळ्या लोकांच्या आहाराच्या सवयी वेगेवेगळ्या आहेत.
काही देशांमध्ये मुख्य़त: शाकाहार घेतला जातो तर काही देशांमध्ये मुख्यत: मांसाहारावर भर असतो.
अन्न शिजविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या असतात. साधने वेगवेगळी असतात. खेड्यामध्ये मुख्यत: मातीच्या चुली तर शहरामध्ये गॅसची शेगडी. पाश्चिमात्य देशात जास्तकरून मायक्रोव्हेव ओव्हन. हे आताआपल्याकडेही लोकप्रिय होत आहेत.
अन्न शिजविण्याची भांडीही वेगवेगळी असतात. अजूनही खेड्यांमध्ये ब-याच ठिकाणी लोक मातीची भांडीवापरतात.
अन्न शिजविण्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत. जसे शिजविणे, भाजणे, तळणे, उकडणे, विस्तवावर ठेवून भाजणे, खुल्या जागी खाली आग लावून भाजणे . मायक्रोव्हेवमध्ये शिजविणे इत्यादी.
काही देशांमधील, मुख्यत: भारतीय लोक अतिशय मसालेदार अन्न खातात तर काही लोक फारच थोडे मसाले वापरतात.
काही लोक निसर्गत: जसे मिळते तसेच खातात तर काहीजण प्रक्रिया करून साठवलेले अन्न खातात.
आंतरराष्ट्रीय अन्न :
अन्नाला आपण ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय म्हणू शकतो. कारण आपल्या रोजच्या आहारातला एखादा अन्न प्रकार कदाचित मूळचा दुस-या देशातील असू शकतो. पण तो आपल्या रोजच्या आहारात इतका सामावून गेलेला असेल की आपणास तो मूळचा आपला नाही हे कदाचित पटणारच नाही.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपला रोजचा चहा घ्या.
भारतामध्ये चहाचे खूप उत्पादन होते. आपण तो निर्यातही करतो. त्यामुळे चहा हा भारतीय नसेल हे आपणास सांगूनही खरे वाटणार नाही. पण चहाचे मूळ चीन आहे. चीनमध्येही चहाचा शोध अगदी योगायोगानेच लागलात्याची कथाही खूप मनोरंजक आहे. ती पुढे केव्हातरी.
आपल्या काश्मीर व हिमाचल प्रदेशात इतकी सफरचंदे होतात की ते त्याचे मूळ युरोपिय आहे ही गोष्टही आपण मान्य करणार नाही.
तीच गोष्ट आहे मका /टोमॅटो / रताळी/ बटाटे यांची.
सांगायचे काय तर जे खाद्यपदार्थ आज अगदी आपलेच वाटतात ते कधीकाळी बाहेरच्या देशातून आले आहेत.
असे अनेक अन्नप्रकार, खाद्यप्रकार आहेत की ते त्यांचे मूळ दुस-या देशातील असूनही आपल्या जीवनात ते एकरूप होऊन गेले आहेत. म्हणूनच मी ’आंतरराष्ट्रीय अन्न’ हा शब्द वापरला आहे.
आहाराच्या बदलत्या सवयी:
आज सर्व प्रगत देशांमधील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलत आहेत. याला अनेक कारणे आहेत. त्यातील काही प्रमूख कारणे आहेत पर्यटनविकास व देशांतर.
जलद प्रवास करण्याची साधने आज मानवासमोर हजर आहेत. त्याचप्रमाणे प्रवास करण्याची कारणेही वाढलेली आहेत. नवनवीन प्रदेश पाहण्यासाठी प्रवास, कामधंद्यानिमित्त प्रवास इत्यादी.
देशांतर करणा-यांचेही प्रमाण वाढलेले आहे. काहींचे शिक्षणासाठी देशांतर तर काहींचे नोकरीधंद्यासाठी देशांतर. देशांतर केल्यानंतर देश तसा वेष या न्यायाने नवीन देशाचा आहार आपलासा करावा लागतो त्यामुळे आहाराच्या सवयी बदलल्या जातात.
आज जग फारच जवळ आले आहे त्यामुळे खाद्यप्रकारही खूप जवळ आलेत. त्यामुळे स्थानिक खाद्यप्रकारांबरोबरच देशोदेशींचे खाद्यप्रकार आता अगदी आपल्या शेजारच्या उपहारगृहातच मिळू शकतात. त्यामुळे कधीकधी वेगळी चव चाखून पाहता पाहता आपण कधी अशा खाद्यप्रकाराचे भोक्ते होऊन जातो कळतही नाही.